Friday, April 6, 2012

आज चौकोनी रस्त्यांवरुनी ,स्मरण पुन्हा तापले ,
कसे होते विष तुझ्या धमन्यांत , पण मरण मज लाभले .

असा उरलो तुकड्यात पूर्वीच्या ,कातून दग्ध निखारे ,
जणू आमावस्येच्या चंद्राचे दुक्ख लेवून स्तब्ध नगारे ,

आठवणी केवळ धुक्यातील स्वप्ने ,मोड्कळून गेलेली ,
त्या सोनेरी केसांची झाक ,निरंतर लेणी भिजलेली ,

शेवटचे वळून पाहतानाही ,लालबुंद डोळे तुझे ,
केवढा गुन्हा मोठा माझा ,आज मला उमजे

निघून गेलीस अचानक , ज्या ज्या रस्त्यान्मधुनी,
तेथील धूळ वाहतो ,आज विराण वारा रडूनी

एक एक भिजक्या कुशीची ,साठवून कहाणी ,
रात्र प्रत्येक वेडी ,माझ्याहून तरी शहाणी

अजूनही कधी मोकाट हिंडतो ह्याच रस्त्यावरूनी ,
पावसात भिजत भरदुपारी ,तुझ्याच स्मरणातुनी

No comments:

Post a Comment